पुणे: आंदोलक बैलगाडा मालकांना अटक, तर बैल कोंडवाड्यात डांबले
Continues below advertisement
बैलगाडा शर्यत सुरु करावी या मागणीसाठी सुरु असलेलं पुण्यातलं आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. काऱण पोलिसांनी बैलगाडा मालकांना अटक केलीय. आणि त्यांच्यासोबत असलेल्या बैलांना कोंडवाड्यात डांबून ठेवलंय. बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवावी आणि पेटा संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी आहे. त्यासाठी बैलगाडा शर्यत संघटनेनं बेमुदत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत धरणं सुरु केलं आहे.
Continues below advertisement