पुणे : फ्लॅट देण्याच्या नावाखाली बिल्डरचा अनेकांना गंडा
Continues below advertisement
फ्लॅट देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून कोट्यावधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार पुणे शहरात घडलाय. २००९ साली एस. के डेव्हलपर्स अँड बिल्डर्सनी वाडे बोल्हाईच्या हद्दीत साडे सात लाख रुपयात फ्लॅट अशी जाहिरात दिली. त्यामुळे अनेकांनी पैसे भरुन फ्लॅटचं बुकींग केलं. ३६ महिन्यात ताबा मिळेल असं बिल्डरने सांगितलेलं असताना ९ वर्ष पुर्ण होऊनही ग्राहकांना ताबा मिळालेला नाहीये. यासंदर्भात बिल्डरकडूनही काही सांगण्यात येत नाहीये. त्यामुळे कारवाईची मागणी करण्यात येतेय.
Continues below advertisement