पुणे : मराठा आरक्षणावरुन पुणे महापालिकेत विरोधकांचा राडा
Continues below advertisement
मराठा आरक्षणाचे पडसाद पुणे महापालिकेतही उमटलेत. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वपक्षीय विरोधकांनी जोरदार राडा घातला. यावेळी शिवसेना नगरसेवकांनी थेट महापौरांच्या आसनासमोर तोडफोड केली. ही घोषणाबाजी सुरु असताना अचानक शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी महापौरांच्या समोरील रेलिंगवरून आता उडी घेऊन त्यांच्या टेबलावरील कुंडी आणि काचेचा ग्लास फोडला. संतप्त भोसले यांना इतर सदस्यांनी आवरल्यामुळे पुढील तोडफोड टाळली. शिवसेनेने त्यावेळी मानदंड पळवण्याचाही प्रयत्न केला, अखेर घोषबाजीच्या गोंधळातच सत्ताधारी भाजपने सभा तहकूब केली.
Continues below advertisement