पुणे : महापालिकेच्या प्रांगणातली दादोजी कोंडदेवांची प्रतिमा दोन तासात हटवली
Continues below advertisement
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पालिकेच्या प्रांगणात बसवलेली दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा अखेर हटवण्यात आली आहे.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत येऊन बाचाबाची सुरु केली. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ब्राह्मण महासंघाने दादोजींची प्रतिमा दूर केली, असं आनंद दवे यांनी सांगितलं.
आज दादोजी कोंडदेव यांची पुण्यतिथी आहे. चार वर्षांपूर्वी लाल महालात असलेला दादोजींचा पुतळा पालिकेने हटवला होता. तो पुतळा पु.ल.देशपांडे उद्यानात ठेवण्यात आला होता. हा पुतळा पुन्हा पालिकेच्या आवारात बसवण्याचा ठरावही एकमुखाने पास झाला. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने ब्राम्हण महासंघाने हे आंदोलन केलं.