स्पेशल रिपोर्ट : पुणे : चिमुरड्यासोबत मस्करीची कुस्करी झाली असती तर?
Continues below advertisement
तुमची मुलं बाहेर एकटी खेळायला जातात, तेव्हा त्यांच्यावर नजर ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पुण्यात जेसीबीच्या बकेटवर चढलेल्या एका चिमुरड्याला ड्रायव्हरने गमतीपोटी घाबरवल्याचा प्रकार समोर आला आहे. खेळत असताना बॉल पोकलेनच्या बकेटमध्ये अडकल्यामुळे तो काढण्यासाठी सार्थक लिंबोणे बकेटवर चढला. ही गोष्ट जेसीबी चालकाच्या लक्षात आली. त्यामुळे सार्थकला घाबरवण्यासाठी ड्रायव्हरने जेसीबी सुरु केली.
Continues below advertisement