पुणे : घरोघरी पेपर टाकणाऱ्या बॉक्सर अक्षय मरेला डोर्फ केटल कंपनीकडून आर्थिक मदत
बॉक्सर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरोघरी पेपर टाकण्याचं काम करणाऱ्या अक्षय मरेच्या जिद्दीची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्याच अक्षयच्या मदतीसाठी आता एक संस्था पुढे आली आहे. डोर्फ केट्ल केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अक्षयला मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनीच्या सामाजिक निधीतून अक्षयचं प्रशिक्षण, आहार आणि इतर आवश्यक खर्च उचलण्यात येणार आहे.