पुणे : पालिकेत स्थायी समितीच्या लॉटरीत सत्ताधारी भाजपला धक्का, 4 सदस्य समितीबाहेर

Continues below advertisement
पुणे महापालिकेत सत्तेत असणाऱ्या भाजपला स्थायी समितीच्या लॉटरीत झटका बसला आहे. कारण, आज काढण्यात आलेल्या लॉटरीत महापालिकेचे स्थायी समितीच्या अध्यक्षासह भाजपचे ४ सदस्य बाहेर पडले आहेत. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत एकूण १६ सदस्य आहेत. त्यापैकी निम्मे सदस्य फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. तर उरलेले आठ सदस्य आणखी एक वर्ष स्थायी समितीमध्ये राहणार आहेत. त्यामुळे १६ पैकी कोणत्या ८ सदस्यांना निवृत्त करावं, यासाठी आज महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत चिठ्ठ्या काढल्या गेल्या. यात
स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपचे ४ सदस्य, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेस, शिवसेना यांचा प्रत्येक एक सदस्याचं नावं निघालं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram