पुणे : संभाजी भिडे कार्यकर्त्यांसह वारीत सहभागी

Continues below advertisement

शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे आणि त्यांचे कार्यकर्ते वारीत सहभागी झाले आहेत. गेल्यावर्षी झालेल्या वादानंतर यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमागे चालण्याचा निर्णय भिडे यांनी घेतला आहे. गेल्यावर्षी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते तलवारी घेऊन पालखीमार्गात सहभागी झाल्यानं मोठा वाद झाला होता. दरम्यान खबरदारी म्हणून आळंदी सोहळा प्रमुखांनी आधीच पोलिसांना याबाबतचं पत्र दिल्यानंतर पोलिसांनी शिवप्रतिष्ठानला नोटीस बजावली. यावर शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते कोणताही अडथळा आणणार नाहीत, आणि पालखी आणि दिंड्या पुढे निघून गेल्यानंतर पाठीमागून चालत येतील, असं आश्वासन शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram