पुणे : बाणेरमध्ये आयटी इंजिनिअरची पत्नी आणि मुलासोबत आत्महत्या
Continues below advertisement
बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका आयटी इंजिनिअरने पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासोबत आत्महत्या केली. पत्नी आणि मुलाची हत्या करुन इंजिनिअरने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जयेशकुमार पटेल असे 34 वर्षीय इंजिनिअरचे नाव, तर पत्नीचे नाव भूमिका पटेल (वय 30) आणि 4 वर्षीय मुलाचे नाव नक्ष आहे.
जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर होते. महिन्याला दीड लाख रुपये पगारावर ते एका नामांकित कंपनीत नोकरीस होते, तर पत्नी गृहिणी होती.
गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे घर आतून बंद होते. त्यामुळे शेजार्यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रात्री 11 वाजता माहिती दिली. चतुरशृंगी पोलिसांनी धाव घेतली. दुसऱ्या इमारतीच्या बाल्कनीतून पोलिसांनी पटेल यांच्या घराजवळ पोहचले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांनी पूर्ण कुटुंब मृत्य अवस्थेत आढळून आले.