पुणे : भाजपच्या कार्यक्रमासाठी बालगंधर्व रंगमंदिरातील पर्यावरण संमेलन गुंडाळलं
भाजपच्या कार्यक्रमासाठी पर्यावरण संमेलन गुंडाळण्यास भाग पाडण्यात आल्याची खंत पर्यावरण संमेलनाच्या आयोजकांनी बोलून दाखवली आहे. अमित शाह यांनी लिहिलेल्या 'भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी' या पुस्तकाचं काल बालगंधर्व रंगमंदिरात प्रकाशन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मात्र या कार्यक्रमासाठी भाजपनं बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेलं पर्यावरण संमेलन गुंडाळल्याचा आरोप होत आहे.