पुणे : बालगंधर्व नाट्यमंदिर पाडून त्याजागी महापालिका आंतरराष्ट्रीय दर्जाचं थिएटर उभारणार
Continues below advertisement
पुण्याचा सांस्कृतिक मानबिंदू मानल्या जाणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडून नवीन रंगमंच उभारण्यात येणार आहे... महापालिकेनं नव्या वास्तूसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आलीए... मात्र नवीन इमारत उभारताना त्याची संस्कृती आणि परंपरा जपली जावी अशी मागणी नाट्यकलाकारांनी केलीए... सध्या बालगंधर्व रंगमंचाचा उपयोग राजकीय कामांसाठीही होतोय.. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाट्यगृह उभारलं जात असेल तर त्याचा राजकिय कार्यक्रमांसाठीही उपयोग होईल अशी शंका कलाकारांना आहे... शिवाय पु. ल देशपांडेंनी उभारलेली ही वास्तू तिची ओळख कायम ठेवेल का असाही प्रश्न नाट्यप्रेमींना पडलाय..
Continues below advertisement