महाराष्ट्र बंद: औरंगाबाद, पुणे: विद्यापीठांनी काही परीक्षा पुढे ढकलल्या
Continues below advertisement
औरंगाबादमध्येही बंदचा परिणाम बघयला मिळलाय, इथं एसटी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. तर शहरामध्ये इंटरनेट सेवाही बंद करणयात आलीय.
याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं आजच्या परिक्षा पुढे ढकलल्या आहेत. एमए, एमबीएचे अभ्यासक्रमाचे आज पेपर होणार होते. तसेच प्रात्यक्षिक परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले विद्यापीठानं आजचा एम.फार्म.चा एक पेपर पुढे ढकललाय. ही परीक्षा पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यात होणार होती. राज्याच्या काही भागातील संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.