पुणे/औरंगाबाद/चंद्रपूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीचं आंदोलन
Continues below advertisement
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढी विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर निदर्शनं सुरु केली आहेत. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं चुलीवर स्वयंपाक करुन घरगुती गॅस दरवाढीचा निषेध केला. 'मोदी तेरा अच्छा खेल, सस्ती दारु महंगा तेल', अशा घोषणा देत राष्ट्रवादीने सरकारविरोधात नारेबाजी केली. औरंगाबादमध्ये महागाईविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
Continues below advertisement