इंधन दरवाढीविरोधात राज्यभरात काँग्रेसची आंदोलनं
Continues below advertisement
ग्रामीण महाराष्ट्राप्रमाणे मुंबई आणि लगतच्या ठाण्यातही इंधन दरवाढी विरोधात विरोधक रस्त्यावर उतरलेत. मुंबईच्या भांडुपमध्ये काँग्रेस आणि ट्रक -टेम्पो असोशिएशनतर्फे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.सोनापूर सिग्नल ते महावीर पेट्रोलपंपपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. आंदोलक बैलगाडी घेऊन थेट पेट्रोलपंपात घुसले. तर तिकडे ठाण्यात काँग्रेसनं सरकारच्या नावानं पिंडदान केलं. काही कार्यकर्त्यांनी केस कापून सरकारविरोधातल्या मुंडन आंदोलनात सहभाग नोंदवला. या आंदोलनासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या घरगुती सिलेंडर घेऊन सहभागी झाल्या.
Continues below advertisement