पुणे : टोलनाक्यावर स्वाईप केलं, तरुणाच्या खात्यातून 87 हजार गायब
Continues below advertisement
पुण्यातल्या दर्शन पाटील या तरुणाला कॅशलेस व्यवहार केल्यानंतर 87 हजारांचा फटका बसला. मुंबईहून पुण्याला येताना खालापूर टोल नाक्यावर दर्शन पाटील यांनी एटीएम कार्डनं 230 रुपये भरले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर जो मेसेज आला तो पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांच्या खात्यातले 87 हजार रुपये वजा झाले होते. यानंतर दर्शन पाटील यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली.
Continues below advertisement