ब्रेकफास्ट न्यूज : अभिनेते शाहू मोडक यांची शंभरावी जयंती, ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
मराठी चित्रपटसृष्टीत जेव्हा पौराणिक पात्र रंगवलेले कलाकार डोळ्यासमोर येतात, तेव्हा शाहू मोडक या ज्येष्ठ अभिनेत्याचं नाव सहाजिकच पहिल्यांदा समोर येतं.
शाहू मोडक यांची विविध रूपं रसिकांनी पडद्यावर पाहिली. रूपेरी पडद्यावर २९ वेळा कृष्णाची भूमिका रंगवलेले शाहू मोडक. तर पडद्यावर पहिल्यांदाच पोलीसाची भूमिका साकारून अजरामर झालेले शाहू मोडक. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे एक ना अनेक पैलू रसिकांनी अनुभवले. 

आणि अशाच एका हरहुन्नरी आणि संवेदनशील कलाकारीच आज १० वी जयंती आहे. आणि त्यानिमित्तानं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ. नुकतीच गाडगीळ सरांनी एक डॉक्युमेंटरी देखील तयार केली आहे. या सगळ्या विषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram