पुणे : सांस्कृतिक मंत्र्यांना कलाकारांबाबत आदर नाही, मोहन जोशींची टीका
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशींनी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंवर जोरदार तोंडसुख घेतलं. राज्यातील सरकारला कला आणि सांस्कृतिक क्षेत्राबाबत अनास्था असून सांस्कृतिक मंत्र्यांना कलाकारांबाबत आदर नसल्याची टीका त्यांनी केली. नाट्य, चित्रपट, साहित्याशी सरकारला काही देणंघेणं नसून आमच्या मागण्यांक़डे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषद, भारतीय चित्रपट महामंडळ आणि नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार घेण्यात आली.