VIDEO | पुण्यात तरुणावर अॅसिड हल्ला करुन गोळीबार, हल्लेखोराने स्वत:लाही संपवलं | एबीपी माझा
पुण्यातील सदाशिव पेठेत रात्रीच्या वेळेस थरारनाट्य पाहायला मिळालं. मैत्रिणीशी बोलत थांबलेल्या एका तरुणावर अॅसिड हल्ला आणि गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये रोहित खरात हा तरुण गंभीर जखमी झाला असून हल्लेखोराने गोळी झाडून आत्महत्या केली. प्रेमसंबंधातून हा संपूर्ण प्रकार घडल्याची चर्चा आहे.