पुणे | 'सुवर्ण' कामगिरी करणाऱ्या पैलवान अभिजीत कटकेशी खास बातचीत

महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेनं सेनादलाच्या संजयवर ६-३ अशी मात करून, अंडर ट्वेन्टी थ्री राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. राजस्थानमध्ये आयोजित या स्पर्धेत अभिजीतनं १२५ किलो गटाचं सुवर्णपदक पटकावलं. महाराष्ट्राच्या सागर मारकडला ५७ किलो, अक्षय हिरगुडेला ६५ किलो आणि कुमार शेलारला ७४ किलो गटात रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेत महाराष्ट्राला एक सुवर्ण आणि तीन रौप्यपदकांसह सांघिक तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola