पुणे-सोलापूर मार्गाचं दुपदरीकरण, इंद्रायणी एक्स्प्रेसला 15 दिवस ब्रेक
Continues below advertisement
पुणे सोलापूर दरम्यान धावणाऱ्या इंद्रायणी एक्स्प्रेसला ब्रेक देण्यात आला आहे. माढा-वडशिंगे स्थानकां दरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने 1 ते 15 एप्रिलदरम्यान इंद्रायणी एक्स्प्रेस धावणार नाही. या दरम्यान सोलापूर- मिरज एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर पॅसेंजर या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तब्बल पाच महिन्यांनंतर पुणे-सोलापूर दरम्यान इंद्रायणी एक्स्प्रेस धावू लागल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, इंद्रायणीला पुन्हा एकदा पंधरा दिवस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याने दररोज अप-डाऊन करणार्या चाकरमान्यांची प्रचंड गैरसोय होणार आहे.
Continues below advertisement