पुणे : मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी ताहिर मर्चंटचा ससून रुग्णालयात मृत्यू
Continues below advertisement
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या आरोपी ताहिर मर्चंटचा मृत्यू झाला आहे. ताहिर मर्चंटची प्रकृती बिघडल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला.
ताहिर मर्चंट हा मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी याकूब मेमनचा सर्वात जवळचा साथीदार होता.
12 मार्च 1993 ला मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी, विशेष टाडा कोर्टाने ताहीरला फाशीची शिक्षा सुनावली होती. 7 सप्टेंबर 2017 रोजी कोर्टाने हा निर्णय दिला होता. मात्र ताहिरच्या फाशीला सुप्रीम कोर्टाने 5 डिसेंबर 2017 रोजी स्थगिती दिली होती.