पुणे : पालक रागावल्यानं 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या
घराबाहेर पडू नकोस, म्हणून पालक वारंवार ओरडत असल्याचा राग मनात धरुन आठवीतील चिमुरडीने टोकाचं पाऊल उचललं आहे. पुण्यात राहणाऱ्या 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने चार वर्षांच्या भावाच्या देखत गळफास लावून आत्महत्या केली.
14 वर्षांची विद्यार्थिनी आई-वडील आणि धाकट्या भावासह पुण्यातील हडपसरमध्ये आदर्शनगर माळवाडीत राहायची. जास्त घराबाहेर फिरु नकोस, घरातच अभ्यास कर असं आई-वडील तिला वारंवार सांगायचे. मात्र ती त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती.