पुणे: 12 वर्षीय हेअर स्टाईलिस्टची 'फेमिना'कडून दखल
Continues below advertisement
वर्षानुवर्ष हेअरस्टाईलिंगचं शिक्षण घेऊन या क्षेत्रात नाव कमावलेल्या आपण अनेक व्यक्ती पाहिल्या आहेत. पण पुण्यातल्या या चिमुकल्या हेअरस्टाईलिस्टचं कौतुक सध्या देशभरात होतंय. जुही सापके असं या १२ वर्षांच्या चिमुकलीचं नाव आहे. जुही मागच्या २ वर्षांपासून हेअरस्टाईलिंग शिकत आहे. आणि तिनं अनेक स्पर्धाही जिंकल्या आहेत. एवढच नाही तर फेमिना मासिकामध्येही तिनं नाव पटकावलंय.
तिच्या या हुशारीमुळे ऑल इंडिया हेअर अँड ब्युटी असोसिएशन नं तिचं नाव लिम्का बुकमध्ये सामाविष्ट करण्याची मागणी केलीये. त्यामुळे देशातील सर्वात लहान असलेल्या या हेअर स्टाईलिस्टवर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय.