पुणे : अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आंबा महोत्सव, 11 हजार आंब्यांचा नैवेद्य
अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंबा महोत्सव आयोजित केलाय. या निमित्तानं बाप्पांना 11 हजार आंब्यांचा नैवेद्य दाखवून आरास करण्यात आली आहे. देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. हे नववं वर्ष आहे.