Thane Potholes | ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन मार्गात खड्डे | ठाणे | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2019 12:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन अवघ्या आठ दिवसांवर आलेली असतानाही, या प्रतिष्ठेच्या शर्यतीच्या मार्गावरचे खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. ठाणे शहरातल्या साऱ्याच रस्त्यांवर सध्या खड्डे पडले आहेत. पण मॅरेथॉनच्या मार्गावरचे खड्डे अजूनही बुजवण्यात न आल्यामुळं, या रस्त्यांवर स्पर्धक धावणार कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मॅरेथॉनचा मार्ग पाहण्यासाठी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे आढळले. त्यामुळं पाहणी दौरा अर्ध्यावरच सोडून त्या पुन्हा पालिका मुख्यालयात परतल्या. त्यानंतर महापौरांनी खड्ड्यांसंदर्भात एक तातडीची बैठक घेतल्याची माहिती आहे.