VIDEO | रॉबर्ट वाड्रांसोबत चौकशीसाठी प्रियांका गांधी उपस्थित राहण्याची शक्यता | नवी दिल्ली | एबीपी माझा
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची जयपूरमध्ये ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाकडून पुन्हा चौकशी होणार आहे. बीकानेर जमीन खरेदीप्रकरणी ही चौकशी होणार आहे. जर आज वाड्रा ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले तर ही त्यांची चौथी वेळ असेल. मागील तीनवेळा लंडनमधील संपत्ती खरेदीप्रकरणात पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली रॉबर्ट वाड्रांची चौकशी करण्यात आली.