मुंबई : 2018 मध्ये नोकरदारांचे पगार 10 टक्क्यांनी वाढणार : सर्व्हे
Continues below advertisement
2018 वर्षात भारतातल्या खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचा पगार 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचं ‘सॅलरी बजेट प्लॅनिंग’नं केलेल्या सर्व्हेत हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
या सर्व्हेमध्ये बीपीओ, केमिकल्स, बांधकाम क्षेत्र आणि अभियांत्रिकी, रिटेल, आर्थिक सेवा, उच्च तंत्रज्ञान, मीडिया, औषध आणि आरोग्यशास्त्र, यासह अनेक खासगी क्षेत्रांसंदर्भात सविस्तर भाष्य करण्यात आलं आहे.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे गेल्या वर्षी भारतातील हजारो कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळाली नव्हती. त्यामुळे यंदा 10 टक्के सरासरी पगारवाढ असेल असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेसाठी जुलै महिन्यात आशियाई पॅसिफिक क्षेत्रातील 4 हजार प्रतिनिधींची मतं विचारात घेण्यात आली. यात 300 भारतीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता.
Continues below advertisement