मुंबई : माजी भाजपाध्यक्षांना स्मरुन अमित शाहांनी राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण
भाजपाध्यक्षांवर आरोप झाले, की ते पदत्याग करतात, असा भाजपचा इतिहास आहे. त्यामुळे जय शाह यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे अमित शाह यांनीही राजीनामा देण्याची गरज आहे, असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांना उत्तर दिलं. या पत्रकार परिषदेला चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आणि आशिष शेलार उपस्थित होते.