नरेंद्र मोदींचा जगभरात दबदबा, नेत्यांच्या रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर!
Continues below advertisement
जागतिक नेत्यांच्या रांगेतही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वरचष्मा बघायला मिळतोय. कारण जागतिक रँकिंगमध्ये नरेंद्र मोदींनी तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन आणि सी वोटर इंटरनॅशनल सर्व्हेने जगातील नेत्यांचं रॅकिंग जाहीर केलं. यात जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्कल पहिल्या क्रमांकावर आहेत, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुअल मॅक्रां दुसऱ्या स्थानावर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर आहेत.
Continues below advertisement