नवी दिल्ली : विनाअनुदानित स्वयंपाक गॅस दरात 48 रुपयांची वाढ
Continues below advertisement
देशातल्या स्वयंपाक गॅसच्या दरात घसघशीत वाढ झाली आहे. विनाअनुदानित स्वयंपाक गॅसच्या दरात 48 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत विनाअनुदानित स्वयंपाक गॅसची किंमत आता 671.50 इतकी झाली आहे. तर अनुदानित स्वय़ंपाक गॅसचे दर 2 रुपये 34 पैशांनी महागल्यामुळे आता हा गॅस 491.31 रुपये दरात ग्राहकांना मिळेल. तर हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या दरात तब्बल 77 रुपयांची वाढ करण्यात आल्यामुळे आता हा गॅस 1244.50 रुपये किमतीत हॉटेल व्यावसायिकांना घेता येणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरातली वाढ, त्यानंतर एसटी भाडेवाढ आणि आता थेट घरातल्या स्वयंपाक घरातल्या गॅसची दरवाढ झाल्याने सामान्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Continues below advertisement