नवी दिल्ली : काँग्रेसच्या इफ्तार पार्टीला प्रणवदांसह विरोधकांना निमंत्रण

Continues below advertisement
ेशीमबागेत हजेरी लावल्यानं वादाच्या केंद्रस्थानी अडकलेले प्रणव मुखर्जी आणि सोनिया गांधी आज आमने-सामने येणार आहेत.
काँग्रेसनं आज मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलंय.
यासाठी देशभरातील 400 दिग्गजांना निमंत्रित करण्यात आलंय. ज्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी,
तृणमूल काँग्रेस, बसपा, सपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह इतर पक्षांच्या प्रमुखांनाही आमंत्रित केलंय.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सोनिया गांधींनी इफ्तार पार्टी आयोजित केली होती. मात्र, त्यावेळी लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेच प्रमुख विरोधी पक्ष नेते उपस्थित होते. शरद पवारही या पार्टीला आलेले नव्हते. त्यामुळे आजच्या इफ्तार पार्टीत विरोधकांची एकी दिसते का? हे पाहण औत्सुक्याचं ठरेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram