मुंबई | युतीचा निर्णय लवकर घ्या, अन्यथा लोकसभा-विधानसभा एकत्रच, सेनेला भाजपचं अल्टिमेटम?

2019 च्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात.. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना भाजपच्या युतीच्या निर्णयावर खलबतं सुरु झालेत.. एकीकडे युतीचा निर्णय लवकर घ्या अन्यथा लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका लावू असा इशारा भाजपनं शिवसेनेला दिल्याची माहिती मिळतेय.. मात्र असं कोणतंही अल्टिमेटम आलं नसल्याचा दावा शिवसेनेतल्या नेत्यांनी केला आहे...  दरम्यान याच सर्व पाश्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खलबतं सुरु आहेत.. सध्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भाजपचे नेते, प्रदेशाध्यक्ष, मंत्र्यांसोबत बैठक सुरु आहे.. आणि या बैठकीत युतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे... त्यामुळे आता भाजप युतीसंदर्भात काय निर्णय घेते हे पाहावं लागेल... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola