Police Drink & Drive | औरंगाबादच्या पोलिसाचं ड्रिंक अॅंण्ड ड्राईव्ह कॅमेरात कैद | एबीपी माझा
औरंगाबादेत चक्क एक पोलीस ड्रंक अँड ड्राइव्ह करताना कॅमेऱ्यात कैद झाला. संतोष सोनावणे असं या पोलिसाचं नाव असून तो विरगाव पोलीस स्थानकात कार्यरत आहे. संतोष सोनावणे बियरचे घोट घेत बेदरकरपणे वाहन चालवत होता. त्यामुळे आता औरंगाबाद पोलिसांच्या कर्तव्य निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. आता संतोष सोनावणेवर औरंगाबाद ग्रामीण पोलीस कारवाई करणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.