मुंबई : मोबाईल चोरामुळे तरुणी लोकलखाली, अल्पवयीन चोर अटकेत
Continues below advertisement
लोकलच्या ट्रॅकशेजारी काठी मारुन मोबाईल चोरण्याच्या प्रकारामुळे एका तरुणीच्या आयुष्याला मात्र ब्रेक लागला आहे. मोबाईल चोरामुळे 23 वर्षीय तरुणीला आपला एक पाय आणि हाताची काही बोटं गमवावी लागल्याची घटना मुंबईच्या सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन चोराला अटकही करण्यात आली आहे.
कल्याणमध्ये राहणारी द्रविता सिंग ही 23 वर्षाची तरुणी नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी लोकलने सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. त्यावेळी सॅण्डहर्स्ट रोड स्थानक सोडताच तिला फोन आला. मोबाईलवर बोलण्यासाठी ती लोकलच्या दरवाजावर गेली. ती फोनवर बोलत असतानाच अचानक तिच्या डोक्यावर बांबूचा जोरदार फटका बसला. त्यामुळे द्रविता थेट लोकलमधून खाली पडली.