जगाला दाखवण्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट? पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडिओ वादात
Continues below advertisement
आधीच मोठ्या विरोधाला तोंड देणाऱ्या मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनवरुन खुद्द पंतप्रधान मोदीच आपल्या एका विधानामुळे टीकेचे धनी होत आहेत. बुलेट ट्रेनचा फायदा झाला नाही, तरी जगाला दाखवण्यासाठी बुलेट ट्रेन सारखे मोठे प्रकल्प हाती घ्यावे लागतात, असं विधान मोदींनी केलं होतं. ज्यावेळी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळचं हे विधान आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मोदींनी हे विधान केलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्टविटर अकांऊटवरुन मोदींचा हा जुना व्हिडिओ अपलोड करुन फक्त दिखाव्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला आहे.
Continues below advertisement