UNCUT | थकलेले, पराभूत झालेले विरोधक तुमचे काय भलं करणार?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं परळीतील भाषण | ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बीडच्या परळीतील सभेमधून विरोधकांवर हल्लाबोल केलाय. दुष्काळग्रस्त बीडमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370चा नारा दिलाय. देशविरोधी काम करणाऱ्यांना जागा दाखवा असं आवाहन मोदींनी केलंय. हताश आणि थकलेल्या नेत्यांची देशाला गरज नसल्याचं सांगत मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केलीय. पाच वर्षांत मराठवाड्यातील जलसंकटावर जगात कुठेही झालं नाही इतकं काम केल्याचा दावा यावेळी पंतप्रधानांनी केलाय. वॉटरग्रीड योजनेतून मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवणार असल्याची ग्वाहीसुद्धा मोदींनी यावेळी दिली. तसंच मतदानाच्या दिवशी सुट्ट्याचा बेत करू नका आणि मतदान जरूर करा असं आवाहन मोदींनी केलंय.