VIDEO | तुमच्या खात्यात दोन हजार आले का? | एबीपी माझा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे 75 हजार कोटी रुपयांच्या 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने'चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देशातील 1 कोटी 1 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात योजनेचा पहिल्या हप्त्याच्या रुपात 2 हजार रुपये जमा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गोरखपूरमध्ये या योजनेचा शुभारंभ केल्यानंतर मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. योजनेबद्दल विरोधक अफवा पसरवत आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वान न ठेवण्य़ाचं आवाहन मोदींनी केलाय.