VIDEO | पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांच्या उत्तररंग पुस्तकाचं प्रदर्शन | मुंबई | एबीपी माझा
प्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांच्या उत्तररंग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज विलेपार्लेतील दिनानाथ नाट्यगृहात पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकातून बालपण, नातेसंबंध आणि आयुष्यातील विविध टप्प्यांचा उलगडा होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यात उत्तरा केळकर यांच्याशी गप्पा, त्यांची मुलाखत आणि त्यांच्या गाजलेल्या गीतांच्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद संगीत रसिकांनी घेतला.