स्पेशल रिपोर्ट : पिंपरी : बर्थडे गिफ्ट म्हणून चक्क कोंबडीचं मुंडकं आणि जोकर, कुटुंब दहशतीत

कुणीही दिलेल्या भेटवस्तूंमुळे सहाजिकच सगळ्यांना आनंद होतो, मात्र पिंपरी चिंचवडमधील भुजबळ कुटुंबीय मात्र भेटवस्तूंमुळे सध्या दहशतीच्या वातावरणात आहेत. भुजबळ कुटुंबातील जयकुमार नामक तरुणाच्या वाढदिवशी कुण्या अज्ञाताने पाठवलेल्या भेटवस्तू भयंकर आहेत.

भुजबळ कुटुंबातील जयकुमारचा वाढदिवस होता. त्याला भेटवस्तू म्हणून कुण्या अज्ञात इसमाने भुजबळ कुटुंबाच्या अंगणात एक डबा ठेवला. त्या डब्यातील वस्तू हादरवणाऱ्या आहेत. त्यात रक्ताने माखलेलं कोंबडीचे तोंड, पत्त्यातील जोकरचं पान आणि मुलगा जयकुमार याचं उलट्या दिशेने लिहिलेले नाव अशा गोष्टी आढळल्या आहेत. या साऱ्या भेटवस्तू जयकुमारला वाढदिवसानिमित्त अज्ञात इसमाने पाठवल्या आहेत.

9 एप्रिलच्या रात्री घडलेल्या हा सारा प्रकार कमी होता की काय, 10 एप्रिल रोजी सकाळी भुजबळ कुटुंबीयांच्या गाडीवर जोकर वगळता पत्त्यातील इतर पत्ते फेकण्यात आले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola