पिंपरी : चित्रकलेचे पुस्तक फाडल्याचा वाद, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Continues below advertisement
शिक्षकांनी शाळेत येण्यास मनाई केल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. देहूरोड येथील खाणीत विद्यार्थ्याने उडी मारली आहे. शुभम सुरवाडे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. एनडीआरएफचे जवान शुभमचा शोध घेत आहेत. मंगळवार संध्याकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली.
शिकवणी संपवून विठ्ठलनगरच्या दगडी खाणीकडे जात असल्याचं शुभमने मित्रांना सांगितलं होतं. मात्र तेथून शुभम परतलाच नाही.
देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय शाळा क्रमांक-2 मध्ये शुभम शिक्षण घेत होता. चित्रकलेचे पुस्तक फाडल्यावरुन शाळेत शुभमचा मित्राशी वाद झाला होता. त्यानंतर शिक्षकांनी त्याला पाच दिवस शाळेत न येण्याची शिक्षा दिली होती. शिक्षकांनी केलेल्या शिक्षेमुळेच आपण आत्महत्या करत असल्याचं शुभमने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
Continues below advertisement