पिंपरी-चिंचवड : दिव्यांगाशी लग्न केल्यास 1 लाखाचं अनुदान, पालिकेचा ठराव
Continues below advertisement
पिंपरी चिंचवडमधल्या दिव्यांगांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. यापुढे पिंपरी चिंचवडमध्ये सुदृढ व्यक्तीनं दिव्यांगांशी विवाह केल्यास त्या जोडप्याला १ लाखाचं अनुदान मिळणार आहे. पिंपरी चिंचवडच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आलाय. शिवाय या निर्णयाचं दिव्यांगांच्या संघटनांनीदेखील स्वागत केलंय. दिव्यांगांचं लग्न जुळवण्यात अडचणी येत असल्याचं समोर आल्यानं समितीनं हा निर्णय घेतलाय. मात्र पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय होणं अद्याप बाकी आहे.
Continues below advertisement