Hindu-Muslim Unity | उर्दू शाळेमध्ये गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा | ABP Majha
Continues below advertisement
गणपती मूर्ती साकारणारे आजवर अनेक हात तुम्ही पाहिले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला असे हात दाखवणार आहोत, जे समाजाचे भविष्य आहेत. तेच हात आज देशाला एकजुटीचा संदेश देत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाकडून शाडूची मूर्ती साकारण्याचं प्रशिक्षण दिलं जातं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आकुर्डीच्या फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत हा उपक्रम पार पडला. मुस्लीम विद्यार्थ्यानी आपल्या हाताने घडवलेली ही बाप्पाची मूर्ती ते त्यांच्या हिंदू मैत्रिणींना भेट म्हणून देणार आहेत. तर गणेशोत्सवादरम्यान त्याच मैत्रिणीच्या घरी आरतीला ही ते हजर राहणार आहेत.
Continues below advertisement