पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या रुग्णालयात मित्राचा वाढदिवस, 24 जण ताब्यात
Continues below advertisement
मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात धिंगाणा घालणाऱ्या 24 तरुणांना पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठ सुमारे 40 ते 50 महाविद्यालयीन तरुण रविवारी रात्री महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पोहोचले, तिथे केक कापला, पिपाण्या वाजवत रुग्णांची झोपमोड केली. त्यामुळे सुरक्षा विभागाने हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचवला. त्यावेळी पोलिसांनी तातडीने रुग्णालय गाठलं. तोवर काही जण पसार झाले. पण पोलिसांनी 24 जणांना ताब्यात घेतलं. या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन सोडून देण्यात आले.
Continues below advertisement