पिंपरी-चिंचवड : नवव्या मजल्यावरुन पडून दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Feb 2018 11:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पिंपरी चिंचवडमध्ये दीड वर्षीय चिमुरडीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. अनिका तोमर असं चिमुकलीचं नाव होतं. काल दुपारी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. तोमर कुटुंब मेट्रो पोलिटीन हाऊसिंग सोसाईटीच्या इ-विंगमध्ये राहायला होतं.आई, आजी आणि आजोबा घरातच होते. अनिका घराच्या बाल्कनित खेळत असताना ती ग्रीलवर चढली आणि तिचा तोल जाऊन ती नवव्या मजल्यावरून खाली कोसळली.