पिंपरी : नवव्या मजल्यावरुन पडून दीड वर्षीय मुलीचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये दीड वर्षीय चिमुरडीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. अनिका तोमर असं चिमुकलीचं नाव आहे. सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. तोमर कुटुंब मेट्रो पोलिटीन हाऊसिंग सोसाईटीच्या इ-विंगमध्ये राहायला होतं.आई, आजी आणि आजोबा घरातच होते. अनिका घराच्या बाल्कनित खेळत असताना ती ग्रीलवर चढली आणि तिचा तोल जाऊन ती नवव्या मजल्यावरून खाली कोसळली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola