पिंपरी : व्यवसायिकाची गोळ्या घालून हत्या
Continues below advertisement
पिंपरीतल्या रहाटणीत व्यवसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. अनिल धोत्रे असं त्यांचं नाव आहे. धोत्रे यांचे काळेवाडीतील पाचपीर चौकात ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं ऑफीस आहे. ते मनी ट्रान्सफरचा व्यवसाय करतात, त्यामुळे त्यांच्याकडे मोठी रक्कम जमा होते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे रात्री साडे अकराच्या सुमारास धोत्रे ऑफीस बंद करून दुचाकीवरुन घरी निघाले होते. त्यांच्या ऑफिसपासून काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
Continues below advertisement