पिंपरी : अभ्यासाच्या तणावामुळे 13 वर्षीय मुलीची आत्महत्या

Continues below advertisement

पिंपर चिंचवडमध्ये अभ्यासाच्या ताणामुळे एका १३ वर्षीय मुलीने आत्महत्या केलीये. अभ्यासक्रम झेपत नाही या क्षुल्लक कारणामुळे खुशी सिंगने आपलं आयुष्य संपवलंय. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या खुषीला अभ्यासक्रम न झेपल्यामुळे ती इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत थोडी मागे पडू लागली.याच नैराश्यातून तिने गळफास घेतलाय. खुशी प्रमाणेच अनेक विद्यार्थी मागचा पुढचा विचार न करता टोकाचं पाऊल उचलतायत. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी मुलांसोबत संवाद साधून यावर तोडगा काढावा असं आवाहन मानसोपचारतज्ज्ञांनी केलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram