पिंपरी : बाळांनो, वेगाने गाडी चालवू नका, अपघातात मृत्यू झालेल्या शिवमच्या आईचं भावनिक आवाहन
Continues below advertisement
इन्स्टाग्राम लाईव्हवर मित्रांना आपण किती वेगाने वाहन चालवतो हे दाखवणं एकाच्या जीवावर बेतलं आहे. तब्बल 120 ते 140 ची वेगमर्यादा दाखवत असताना, चालक शिवम जाधवचा (वय 21 वर्ष) अपघातात मृत्यू झाला.
पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी (13 मे) पहाटे पाच वाजता हा अपघात झाला.
शिवम आणि त्याचा आतेभाऊ हृषिकेश पवार हे चिंचवडहून पिंपरीच्या दिशेने येत होते. तेव्हा हृषीकेशने शिवमच्या इन्स्टाग्रामवर लाईव्ह सुरु केलं. शिवमने गाडीचा वेग ताशी 120 ते 140 किमीवर नेला. तोपर्यंत इन्स्टाग्राम लाईव्ह सुरुच होतं.
पण कार पिंपरी ग्रेडसेपरेजटजवळ आली असता, नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकाच्या पिलरला धडकल्याने अपघात झाला. सुसाट वेगात असल्याने दुभाजकावरुन सुमारे 500 मीटर घसरत गेली. यात शिवम जाधवचा जागीच मृत्यू झाला.
तर मोबाईल हातात धरलेला हृषीकेश पवार गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.