पिंपरी : पिंपळे निलखमध्ये घरफोडी, वीस लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
Continues below advertisement
पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल वीस लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. पिंपळे निलख येथील करिपाल थॉमस यांच्या बंगल्यावर चोरट्यांनी हा डल्ला मारला. काल थॉमस कुटुंबातील व्यक्ती आपापल्या कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. ही संधी साधून चोरट्यांनी दुपारी अडीचच्या सुमारास घरात प्रवेश केला. आणि घरातील कपाट उचकटले. यात दागिने आणि काही रोकड चोरट्यांनी लंपास केली.
Continues below advertisement