पिंपरी : पिंपरीमध्ये 15 जणांच्या टोळक्याचा तुफान राडा
Continues below advertisement
पिंपरी-चिंचवडमध्ये काल रात्री १० ते १५ जणांच्या टोळक्यानं तुफान राडा घातला. हातात लाकडी दांडके घेऊन ७ ते ८ वाहनांची तोडफोड या टोळक्यानं केली. यावेळी तलवारीही नाचवण्यात आल्या. काल दुपारी दोन गटात झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या परिसरातील काही महिला बाहेर पडल्यानंतर अखेर तणाव निवळला. पोलिसांकडून या टवाळखोरांचा शोध घेण्यात येतोय. आजही या परिसरात तणाव कायम आहे.
Continues below advertisement